
श्रीगोंदा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिला भगिनींकरिता जाहीर केली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यामध्ये नागवडे यांच्या यांनी चांगले काम केले आहे. शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याकरिता प्रयत्न केले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार (दि. २२) रोजी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे व महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी दिली.
या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्याच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह आ. संग्राम जगताप, राज्य मार्केट कमिटीचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्रदादा नागवडे व अनुराधाताई नागवडे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष शिंदे व संचालक मंडळ उपस्थित होते.
