श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर करण्यांत आले राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खासगी आयटीआय कार्यरत आहेत. यापैकी १०८ आयटीआय ना त्या त्या जिल्ह्यातील थोर व्यक्तीस्वातंत्र्यसैनिक, संत व समाजसुधारांची नावे देण्यात आली. आयटीआयचे नामांतर ही ऐतिहासिक घटना आहे
- या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात झाला बदल श्रीगोदा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री संत शेख महंमद महाराज, अहिल्यानगर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कै. माणिकराव नरसिंगराव पाटील, कर्जत शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेचे श्री संत शिरोमणी गोदड महाराज नाव देण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते, शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्टचे ट्रस्टी राजू भाई शेख, अजिजभाई शेख, यात्रा कमिटीचे सदस्य पोपट आबा खेतमाळीस आणि गोपाळ मोटे पाटीलसह अवधूत राऊत, चंदन घोडके, माधव बनसुडे व सतीश बोरुडे उपस्थित होते. या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना शासनाच्या या निर्णयाचे
स्वागत केले व समाजातील धार्मिक ऐक्य व शांततेचा महत्त्वाचा संदेश दिला. यात्रा कमिटीचे सदस्य गोपाळ मोटे पाटील व पोपट आबा खेतमाळीस यांनीही आपल्या मनोगतातून शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, संतांच्या कार्याचा आदर्श घेवून शिक्षण क्षेत्रात प्रगती होत राहावी, यासाठी या निर्णयाने प्रेरणा मिळेल. याप्रसंगी आयटीआय मधील प्राचार्य सोमनाथ जाधव, शिक्षक वृंद, तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरूडे, अवधूत राऊत, राजेंद्र उकांडे, घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
