
श्रीगोंदा : अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाची सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये विविध शैक्षणिक विषयावर चर्चा झाली. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र सोनवणे, तर सरचिटणीसपदी मिथुन डोंगरे, तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या सदस्यपदी सुनील भोर व कोपनर सर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
निवडीनंतर शिक्षणाधिकारी अशोक कडूस व अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, उपशिक्षणाधिकारी बाबासाहेब धनवे , क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे उपस्थित होते. या बैठकीमध्ये अशोक कडू, ज्ञानेश्वर खुरंगे, बाबासाहेब धनवे, बाळासाहेब बुगे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी विविध तालुक्यातील अध्यक्ष, सचिव व कौन्सिल सदस्य उपस्थित होते.
