
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील आनंदकर मळ्यातील भूमिपुत्र असलेले कलेक्टर अरुणआनंदकर यांनी सावतानगर परिसरातील सहादू बयाजी शिंदे यांच्या आई ( वय 110) असलेल्या गिरजाबाई शिंदे यांची भेट घेतली. भेटी दरम्यान कलेक्टर अरूण आनंदकर हे लहानपणीच्या आठवणीत रमले होते. आजींनी कलेक्टर आनंदकर हे लहान असतान मायच प्रेम, जिव्हाळा दिला होता. तेच प्रेम कायम आठवणींत ठेऊन गावातील मातीशी असलेली नाळ कधी तुटू द्याची नाही या भावनेतून ही भेट झाल्याचे कलेक्टर अरुण आनंदकर याच्या बोलण्यातून जाणवत होते.
आनंदकर बोलताना अनेक जुन्या आठवणीत रमले होते. आजीशी लहानपणी घडलेल्या अनेक गोष्टीवर ते बोलत असताना आजीच्या आणि कलेक्टर आनंदकर याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. प्रेमाची माणसं कायम जोडून ठेवायचे असतात. गावाशी असलेला जिव्हाळा कायम सोबत ठेवायचा असतो असे बोलताना आनंदकर यांनी सागितले. यावेळी मित्रपरिवार उपस्थित होता.
