
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील
शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या श्रीगोंदा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित श्रीगोंदा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन पोपट कोथिंबिरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दि. २८) रोजी संपन्न झाली. सचिव राजू सिदनकर यांनी सन २०२३ २०२४ चा अहवाल वाचन करून विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन केले.
सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, चर्चेत एकनाथराव आळेकर, नानासाहेब शिंदे, भाऊसाहेब खेतमाळीस, ज्ञानदेव शिरवाळे, शिवाजी शेळके, माधवराव डवाण, सोपानराव पाटील, बबनराव आनंदकर, राजू दादा गोरे, दादासाहेब औटी, प्रदीप औटी यांनी सहभाग घेतला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संस्थेचे माजी चेअरमन अशोकराव आळेकर व भीमराव आनंदकर यांनी दिली.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन पोपट कोथिंबिरे यांनी सांगितले की, सभासदांनी ज्या काही सूचना केल्या आहेत त्यांची काटेकोर पणे अंमलबजावणी केली जाईल. तसेच आजच्या सभेतील सर्वात जास्त चर्चा झालेला इमारत बांधकाम विषय मी स्वतः पूर्ण वेळ देऊन लक्ष घालून पारदर्शकपणे पुर्ण करण्यात येईल याची खात्री देतो असे सांगितले. याप्रसंगी नगरसेविका सीमाताई गोरे, इंजिनिअर नवनाथ दरेकर, आणि तुळशिदास मंगल कार्यालय सभेसाठी विनामोबदला उपलब्ध करून दिले याबद्दल प्रशांत गोरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पीएस आय परीक्षा उत्तीर्ण झालेले निखिल बोरूडे यांचा सत्कार करण्यात आला.
सभेच्या शेवटी संस्थेचे व्हा. चेअरमन पती सूर्यकांत वडवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सभेस संस्थेचे व्हा. चेअरमन मंदाकिनी वडवकर, संचालक बापुराव सिदनकर, सखाराम औटी, मोहनराव डांगरे, सुनिल बोरूडे, सुभाष बोरुडे, अनिल नन्नवरे, हनुमंत उदमले, ज्योती हेमंत खेतमाळीस, तसेच संस्थेचे इंजिनिअर देविदास शिंदे तसेच सभासद श्री बापुराव औटी, पोपटराव बोरूडे, कालीदास खेतमाळीस, रोहीदास मखरे, सखाराम गांडुरे, बापुराव खेतमाळीस, विस्तार अधिकारी श्री निळकंठ बोरूडे, संस्थेचे मॅनेजर श्री भाऊसाहेब सिदनकर, लक्ष्मणराव बनसुडे, बाळासाहेच कोथिंबीरे, राहुल सिदनकर, संजय दरवडे, तेजस कोथिंबीरे, गणेश ससाणे व श्रीगोंदा शहर परिसरातील शेतकरी, सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
