
श्रीगोंदा : इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीगोंद्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
रविवार (दि. 29) रोजी श्री. संत सावता महाराज मंदिर श्रीगोंदा येथे उत्साहात संपन्न झाली.
विषय पत्रिकेवरील सर्व विषय संस्थेचे सचिव पांडुरंग मेहेर यांनी वाचून दाखवले. सभासदांनी
टाळ्या वाजवून सर्व विषयास मंजुरी दिली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथराव आनशीराम आळेकर यांनी सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून सभासदांना कर्जवसुली संदर्भात आवाहन केले.
सभासदांना १५%डिव्हिडंड देण्याचेही जाहीर केले.
श्रीगोंदा सोसायटीचे माजी चेअरमन विद्यमान संचालक भिमराव आनंदकर, अशोकराव आळेकर, सभासद निलकंठ बोरूडे यांची भाषणे झाली.
त्याचप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला व
इतर प्रावीण्य मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
तसेच अक्षय अशोक गायकवाड याच्या आजारपणासाठी मदत म्हणून रू11000/- चा चेक देण्यात आला.
सदर सभेस श्रीगोंदा सोसायटीचे संचालक बापुराव सिदनकर, सुभाष बोरुडे, व्हा.चेअरमन मिठू वडवकर, सोसायटीचे माजी चेअरमन पोपटराव बोरूडे . कालीदास खेतमाळीस, शिवाजी शेळके, जगन्नाथ औटी, रविकांत दंडनाईक व इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीगोंदाचे सर्व संचालक . कर्मचारी,बिंदुसागर ठेव प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोकराव आळेकर यांनी केले.
उपस्थितांचे आभार संस्थेचे व्हा. चेअरमन महादेव कदम यांनी मानले.
