
श्रीगोंदा (प्रतिनिधी )श्रीगोंदा तालुक्याचे रेल्वे लाईन मुळे दोन भाग पडतात.आज पर्यंत श्रीगोंदा तालुक्याला जे पण आमदार झाले ते पश्चिमेचे झाले आहे त्यांनी आज पर्यंत फक्त स्वतःचे घरे भरले विकास काही केला नाही. आजही रस्ते, वीज, पाणी या भौतिक प्रश्ना भोवती श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण फिरत आहे. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाही. कृषी महाविद्यालय आलेले टिकवता आले नाही. एम आय डी सी आज पर्यंत झाली नाही. युवक 1985 पासून एम आय डी सी होईल या आशेवर बसलेत आजून या युवकांचे लग्न झाले नाही. श्रीगोंदा तालुक्यात सगळ्यात जास्त युवक बिन लग्नाचे सापडतील. ज्यांना रोजगार नाही अशा बेरोजगारांना आपण तरी आपली मुलगी देऊ का? हीच मुले लग्न नाही रोजगार नाही या विचारांनी ही मुले व्यसनी झाले आहेत याला कारण पण हेच राजकारणी आहे.यासाठी मतदारसंघात विचारमंच निर्माण करून, लोकांचे प्रश्न जाणून घेऊन या संदर्भात लोकजागृती निर्माण करण्यासाठी वेळोवेळी चिंतनशिबिरांचे आणि व्याख्यानांचे आयोजन केले जाईल.वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यावर भर दिला जाईल.उपलब्धता साधनसामुग्री आणि उद्योग व्यवसायासंदर्भात मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या यंत्रणानिर्माण मार्गदर्शन शिबीर युवकांना उपलब्ध करुन दिले जाईल.स्पर्धापरीक्षांसाठी मार्गदर्शनपर केंद्रे आणि अभ्यासिका निर्माण केल्या जातील.एकंदर आपल्या मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण करायची असेल, तर मतदारसंघातील जाणत्या, तटस्थ समाजहितचिंतकांचे मार्गदर्शन प्रतिनिधींनी विचारात घेऊन एक कमिटी तयार करुन त्या कमिटी मार्फत विकास कामे करणार .
एकदा माझ्या सारख्या सर्व सामान्य घरातील आपल्या भावाला आपल्या मुलाला आमदार करा पहिले काम एम आय डी सी चा प्रश्न विधानसभेत मांडेल आणि एम आय डी सीच करेल आणि स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार जेणेकरून आपल्या तालुक्यातील मुलामुलींना हाताला काम मिळेल. मुलांना रोजगार मिळाला तर त्यांना कोणी पण मुलगी देईल त्यांचा संसार सुखाचा होईल. आपल्या मुला बाळाच्या कल्याणासाठी एकदा मला आमदार करा असे गोरख आळेकर यानी सांगितले.मी निवडणूक लढतोय! कारण माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेसाठी…माझ्या शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी…माझ्या माता-भगिनींच्या संरक्षणासाठी…माझ्या बांधवांच्या रोजगारासाठी…मला साथ द्या.”हिरा म्हणजे अंधारात असलेल्या नव्या जगाला लाभलेला प्रकाश”त्यामुळे येत्या २० तारखेला “हिरा” या चिन्हा समोरील बटन दाबून आळेकर गोरख दशरथ यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी दया.

