श्रीगोंदा ( प्रतिनिधी )
श्रीगोंदा विधानसभा प्रचार सभेत भेटीगठीत रंगत येऊ लागली असताना जनशक्ती लोकशाही पार्टीचे उमेदवार गोरख आळेकर यांनी वंचितच्या उमेदवाराची चांगलीच पोलखोल केली.
वंचितचे उमेदवार ज्यावेळी ग्रामपंचायत अनुसूचित जाती साठी राखीव होती त्यावेळी ते एकदा पण ग्रामपंचायतीकडे फिराकले नाही कि मदत केली नाही.ग्रामपंचायतीचा काळ पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायती मध्ये यांच्या पुत्राची वर्णी सरपंच म्हणून लागली. सरपंच पद ग्रहण करण्यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालय गोमूत्र शिपडून पवित्र करून घेतले आणि मगच पद ग्रहण केले. अनुसूचित जातीच्या सरपंचांनी वापरलेली खुर्चीसुद्धा फेकून दिली. लूंबिनी विश्रामगृहाचे नाव सुद्धा यानी काढावे.गौतम बुद्ध यांच्या जन्मास्थळाचे नाव होते हे त्यांना माहित नव्हते काय?
अशा जातीयवादी मनुवादी विचाराच्या उमेदवाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी अशा जातीभेद करणाऱ्या उमेदवाराला दिलीच कशी?
अशा उमेदवारमागे वंचित ओबीसी,समाज उभा राहिल?23 तारखेनंतर हा उमेदवार वंचित पक्षात तरी राहिल काय? जनता आता हुशार झाली आहे यांच्या मागे जाऊन आपले काय साध्य होणार याचा विचार जनता नक्की करेल? 2009 साली अशीच उमेदवारी केली याच मताच्या जोरावर 2014 ला सेटलमेंट केली दिला ओबीसी समाज वाऱ्यावर सोडून अशाना ओबीसी समाज कधीच माफ करणार नाही. मी उमेदवारी करत आहे ती जनतेच्या सेवेसाठी करत आहे. कारखानदाराकडे उसाचे पैसे देयाला पैसे नव्हते मग एवढा अचानक पैसा कसा आला? लॉटरी लागली काय याची पण येणाऱ्या काळात चौकशी होईल. एका समाजाच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत आपल्या कारखान्यात ओबीसी समाजाला स्थान नसेल तर आपल्याला ओबीसी समाजाला मत मागायचा नैतिक अधिकार नाही.
आपण 40 वर्षे राजकारण केले या 40 वर्षात तालुक्यात साधी एम आय डी सी आणू शकले का? साकळाई योजना पूर्ण होऊ शकली काय?
रस्ते आहेत का तालुक्यात? आजही जी विकास कामे चालू आहेत त्यांना दर्जा आहे का? तुमच्या टक्केवारीने तालुक्याचा दर्जा ढासाळा आहे. ही लोकशाही आहे राजेशाही नाही वय झालं म्हणून मुलाला उमेदवारी दिली ही काय घराणेशाही आहे का? तालुक्यात तुमच्याशिवाय कोणी तालुक्याचे नेतृत्व करु शकत नाही काय?
सहकार महर्षी म्हणायचं आणि बाहेर खाजगी कारखाने काढायचे? कर्मचाऱ्यांच्या पगारातून घरचे कार्यक्रम करायचे?संस्थेत शिक्षक-शिपाई भरती करताना कितीचा आकडा घेता आणि आज त्या शिक्षकांकडून तुमच्या प्रचाराची अपेक्षा ठेवता. एवढी माया गोळा केली तरीही तुम्ही रेस मध्ये येईना याचे काय कारण आहे एकदा आत्मपरीक्षण करा.
आपल्या तालुक्याचे वाटोळे या पुढऱ्यांनी केले आहे मतदार राजा जागा हो 20 तारखेला डोकं शांत ठेऊन विचारपूर्वक मतदान करेल याची खात्री मला आहे.साकळाई योजना करण्यासाठी माझ्या सारखा कार्यकर्ता जीवाचं रान करील पण ही योजना पूर्ण करेलच.डी वाय 10 बाबत पुढारी काही बोलत नाही कि जनता पण आता काही बोलेना डी वाय 10 लोक विसरले काय? डी वाय 10 चे काम पूर्ण करून लाभधारक शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार.
आज मुलांचे लग्न न होण्यामागे याच पुढऱ्यांचा नाकर्तापणा मुळे तरुणांचे लग्न होईना. या तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे काम पुढऱ्यांनी केले नाही परिणामी तालुक्यात बेरोजगारी वाढली. बेरोजगाराला कोण मुलगी देईल? या तालुक्यात पहिले प्रधान्यांनी मी एम आय डी सी आणणार आणी स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार. ग्रामीण रुग्णालयाचे उपजिहा रुग्णालयात रूपांतर करून रुग्णाची सेवा करणार. शासकीय कामातील दिरंगाई दूर करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस जनता दरबार भरवणार आणि जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणार.
कुकडीचे पाणी टेल टू हेड वाटप करत असताना कर्जत ला पाणी पोहचल्यावर श्रीगोंदा तालुक्यातील चाऱ्यांना पाणी सोडणार. प्रत्येक रोटेशनला नदी, ओढ्या वरील बंधारे भरून घेतले जाणार. कुकडी लिंक कॅनॉल 132 च्या टेल पर्यंत पाणी देणार.
मतदारसंघात दर्जेदार रस्ते तयार केले जाईल.आय टी पार्क उभारणार,पर्यटन स्थळे विकसित करणार. अशी माहिती गोरख आळेकर यांनी प्रसिद्धी पत्रात दिली आहे.
