श्रीगोंदा प्रतिनिधी
श्रीगोंदा शहराला वरदान ठरणारी जलवाहिनी सरस्वती नदी आहे.नदी असून पावसाळा सोडला तर या नदीत पाणी शिल्लक राहत नव्हते म्हणून शहरातील तरुणांनी एकत्र करत गोरख आळेकर यांच्या पुढाकार्यातून नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले तेव्हापासून श्रीगोंदा शहर टँकर मुक्त झाले. नदीवर पक्के बंधारे व्हावे यासाठी सरस्वती नदी सुशोभीकरण समितीच्या वतीने पाठपुरावा केला त्याला यश पण आले शासकीय कामात दर्जाच नसल्याने कोट्यावधीचा निधी पाण्यात गेला असे स्थानिक शेतकरी बोलतात.
सरस्वती नदीवरील कोंबडे मळा बंधाऱ्याचे कामकाज पूर्ण होऊन त्या बंधऱ्याचे दरवाजे टाकण्यात आले तरीही त्या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबच शिल्लक राहत नसेल तर एवढा कोट्यावधी रुपयाचा बंधारा करुन शेतकऱ्यांना फायदा काय? संबंधित जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराने कोट्यावधी रुपये हडप तर केले नसेल ना?
सविस्तर वृत्तांत साठी उद्याचा अंक वाचा.
