श्रीगोंदा (प्रतिनिधी )
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस आरोग्य हरून बसला आहे एकीकडे पैशामागे धावायचे आणि आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करायचे असाच ट्रेड सध्या चालू आहे कामानिमित्त धावपळ होते आणि या धावपळीमध्ये खानपान याकडे दुर्लक्ष करून फास्ट फूड खाण्याकडे जनतेचा कल वाढला आहे फास्ट फूड खाण्याने शरीराचे विकार माणसाला जडतात परंतु वेळ आणि पैसा या दोघांची संगत घालत माणूस हा फास्ट फूडकडे वळला आहे आज माणूस हा आरोग्यकडे दुर्लक्ष करत आहे त्याचाच परिणाम म्हणून आज स्थूलपणा, शुगर ,बीपी ,दमा यासारख्या आजारांना माणूस बळी पडत आहे आज अटॅक येण्यासाठी वयाची अट राहिली नाही कोणालाही अटॅक येतो अथवा शुगर बीपी यासारखे आजार पूर्वी वयाच्या चाळीसी नंतर व्हायची आता लहान बालकांना सुद्धा शुगरचे त्रास होताना आपण पाहतोय या मागचे एकच कारण आहे अवेळी जेवण आणि अवेळी झोप यामुळे माणसाचे आरोग्य बिघडत चालले आहे यावर उपाय म्हणून आपण रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे गरजेचे आहे त्यासाठी आपणास रोज सकाळी कोणता व्यायाम करावा व काय खावे आणि काय खाऊ नये यासाठी आहार तज्ञ यांचा सल्ला आपण नक्कीच घेतला पाहिजे तसेच आपला बी एम आय रिपोर्ट काढला पाहिजे तो काय येतोय त्यावर काय उपाय योजना आहेत याचा लेखाजोखा आपण दर तीन महिन्यांनी घेतला पाहिजे. आरोग्य सल्लागार यांच्याशी आपण संपर्कात येऊन आपल्या दररोजच्या जेवणाची व झोपेची काळजी कशी घ्यावी तसेच काय खावे आणि काय टाळावे याची माहिती आपण घेतली पाहिजे तरच आपल्याला चांगले निरोगी आरोग्य मिळू शकते यासाठीच श्रीगोंदा शहरांमध्ये पारगाव रोड संत सावता माळी चौक कोकाटे कॉर्नर या ठिकाणी रुद्र वेलनेस आणि फिटनेस सेंटर हे सुरू करत आहोत आपणास आरोग्याचा बीएमआय मोफत सल्ला दिला जाईल तसेच मोफत आरोग्य सल्ला दिला जाणार आहे. तरी या आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा असे आव्हान शहाजी खेतमाळीस व दुर्गा खेतमाळीस यानी केले आहे…

