
श्रीगोंदा : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक आचारसंहिता जाहीर झाली आहे त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दररोज विविध मतदारसंघातून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. गोरख आळेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून राज्यासह देशभरात चर्चेत आलेले गोरख आळेकर हे लोकसभेच्या निवडणुकीत अहिल्या नगर मध्ये 3ऱ्या स्थानावर राहिलेले आहे. लोकसभेत खा. लंके, मा. खा. विखे नंतर गोरख आळेकर यांच्या नावाची चर्चा होती. लोकसभेला प्रचर यंत्रणा राबवताना कोणत्याही प्रकारचा बॅनर पोम्प्लेट अथवा कर्ण कर्कश आवाजातून प्रचार या सर्व यंत्रणेल फाटा देत प्रत्यक्ष भेटी गाठीवर भर देत 44597 मताधिक्य घेतलें आहे.आळेकर हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसिव्ह असणारे व्यक्तिमत्व आहे तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अहोरात्र झाडणारा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची संपूर्ण तालुक्याला ओळख आहे. लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव मिळवून देण्यामध्ये आळेकरांचा मौलाचा वाटा आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेले तसेच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही श्रीगोंदा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख असणारे व्यक्तिमत्व आहे. श्रीगोंदा नगरपालिका हद्दीतून उमेदवारी केल्यास आळेकर यांना श्रीगोंदा शहर मताधिक्य देईल . आळेकर यांचाकुकडीच्या पाण्यासाठी चा संघर्ष, नगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराविषयी केलेले आंदोलन यासारख्या अनेक कार्यामध्ये गोरख आळेकर यांचा परिचय आलेला आहे .सर्व व्यापारी शेतकरी कष्टकरी तरुणांशी सलोख्याचे संबंध असल्याने आळेकर यांची जमेची बाजू आहे.
आळेकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले जनभावनेचा कौल विचारात घेऊन योग्य निर्णय घेणार असल्याचे बोलले.
