
श्रीगोंदा : लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याचे बाजारभाव तेजीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. पण नुकतेच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांच्या माध्यमातून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत अहिल्या नगरमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 37,736 गोणी गावरान कांदा आवक झाली होती. आजच्या लिलावात या बाजारात 1 नंबर कांदा 4000 ते 4600, 2 नंबर 3200 ते 4000, 3 नंबर 2100 ते 3200, 4 नंबर 1000 ते 2100 रुपये प्रतिक्विंटल या दरात विकला गेला. तसेच लाल कांद्याची चाळीस हजार 494 गोणी आवक झाली होती. यात 1 नंबर कांद्याला 3400 ते 4000, 2 नंबर 2700 ते 3400, 3 नंबर 1500 ते 2700, 4 नंबर 500 ते 1500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
