
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरालगत असणाऱ्या भोळे वस्ती, रायकर वस्तीकडे जाणारे रस्ते काही ठिकाणी खचले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना व शाळकरी मुलांना रस्त्याने जा- ये करताना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याच्या बाजूनी वाढललेल्या वेड्या बाभळी रस्त्यावर येत आहेत. दोन वेळा नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून देखील सुद्धा काहीच उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत.तसेच वडवकर वस्तीवरून, पिंपळेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला वेड्या बाभळी उगवलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना जा – ये करताना त्रास होत आहे. वरील समस्या आठ दिवसात मार्गी लागल्या नाहीतर नागरिकांनी नगरपरिषदेसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुख्याधिकऱ्यांना दिलेल्या निवेदनावर डॉ. सागर कोथिंबीरे, तुषार रायकर, दादा वडवकर, किरण वडवकर, ओंकार रायकर, किरण हिरडे, अमोल भोळे, हनुमंत रायकर, नवनाथ रायकर, मिठू रायकर, संतोष रायकर, राहुल वडवकर, सचिन हिरडे, दीपक भोळे यांच्या सह्या आहेत.
