
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली असून सोमवारी झालेल्या निलावात एक नंबर प्रतीच्या कांद्याला २ हजार ७०० रुपये दर मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवार व्यतिरिक्त आठवडाभर कांदा मार्केट सुरु असते. मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते. दिवसातून तीन वेळा कांद्याचा लिलाव होतो. श्रीगोंदा तालुक्यातील कांद्याची प्रतवारी चांगली असल्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडीसा, पश्चिम बंगाल, केरळ आदी ठिकाणाहून येथील कांद्याला मागणी असते. येथून बांगलादेश, दुबई, कोलंबो आदी ठिकाणी माल पाठवला जातो. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार मध्यवर्ती भागात असल्याने समितीमध्ये शेजारील कर्जत, दौड, शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा आणतात, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे येथील भावाप्रमाणे श्रीगोंदा येथे भाव मिळत असल्याने शेतकरी येथे आपला माल देणे पसंत करतात. कारण बैंगलोर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आदी ठिकाणी माल वाहतुकीसाठी येणारा खर्च वाचतो व दरही तोच मिळतो. त्यामुळे दिवसेंदिवस आवक वाढत असल्याचे येथील संचालक व्यापारी लौकिक मेहता, गौरव पोखर्णा, दीपक भंडारी व मयूर बोरा यांनी सांगितले. तालुक्यातील भानगाव, टाकळी लोणार, कोथुळ, कोसेगव्हाण, पिसोरे, तांदळी दुमाला, घोटवी, देऊळगाव, पुगलबडगाव, सुरोडी, वडाळी, चिंभळा, हगेवाडी, बेलवंडी व परिसरातील शेतकरी नेहमीच कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून भरपूर उत्पन्न घेत आहेत. सध्या गुलाबी कांद्याची चांगली आवक असून दोन-तीन आठवड्यानंतर गावरान कांदा येण्यास सुरुवात होईल असे व्यापाऱ्यानी सागितले. सोमवारी झालेल्या लिलावामध्ये एक नंबर चांगल्या प्रतीच्या कांद्यास २७०० रुपये भाव मिळाला, तर त्याखालील दोन नंबर कांद्यास श्रीगोंद्याचा कांदा विदेशात श्रीगोंदा तालुक्यातील कांद्याची प्रतवारी चांगली असल्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडीसा, पश्चिम बंगाल, केरळ आदी ठिकाणाहून येथील कांद्याला मागणी असते. येथून बांगलादेश, दुबई, कोलंबो आदी ठिकाणी माल पाठवला जातो अशी माहितीही येथील व्यापाऱ्याऱ्यांनी दिली. यापुढे कांदा मार्केटवर विशेष लक्ष देऊन नजीकच्या काळात काष्टी, कोळगाव व देवदैठण येथे उपबाजार सुरू करून कांदा उत्पादक शेतकयांना जवळ मार्केट उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, वाहतूक खर्च वाचून त्यांच्या पदरात जास्त पैसे राहतील. अतुल लोखंडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा. पंधराशे ते दोन हजार रुपये भाव मिळाला, तर तीन नंबर कांद्यास त्यापेक्षा थोड़ा कमी भाव मिळाला. येथील व्यापाऱ्यांनी मालाचे योग्य वजन, रोख पेमेंट व चांगली सेवा देण्याची परंपरा कायम ठेवल्याने शेतकऱ्यांचा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती वरील विश्वास वाढत असल्याचे शेतकरी सांगतात.
