
श्रीगोंदेकरांना घरातील व्यक्ती गेल्यानंतर दशक्रिया विधीसाठी सिद्धटेक किंवा लिंगेश्वर मंदिर श्रीगोंदा कारखाना या ठिकाणी जावे लागत आहे यामुळे श्रीगोंदेकरांची हाल होत आहे नातेवाईक मित्रमंडळी यांनाही या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे. दशक्रिया विधी हा ज्या गावात मयत होते त्याच गावात करण्याची प्रथा इथून मागे रुढी परंपरा नुसार चालत आले आहे परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये यामध्ये काही अज्ञानी लोकांनी काकपर्श झाला नाही तर मृत व्यक्तीच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असं समजून त्याला नारायण नागबळी करण्यास सांगितले जाते हा खर्च किंवा त्रास होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी काकपर्श होतो अशा ठिकाणी दशक्रिया विधी नेण्याची नवीन पद्धत रूढ होत आहे.
दशक्रियेविषयीची खालील आख्यायिका प्रसिद्ध आहे.
एकदा श्रीराम आणि सीतामाता वनवासात विश्राम करीत असतात. तेथे एक कावळा येतो आणि तो सीतामातेला त्रास देत असतो. काही केल्या तो त्यांचा पिच्छा सोडत नाही, तेव्हा त्रासून त्या श्रीरामांना उठवतात आणि कावळा त्रास देत आहे अशी तक्रार करतात. त्यावेळेस श्रीरामांकडे धनुष्यबाण तसेच दुसरे कोणतेही शस्त्र नसते, म्हणून ते जवळच पडलेली एक गवताची काडी (दर्भ) मंत्रून कावळ्यावर फेकतात, तो दर्भ कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतो आणि कावळा एका डोळ्याने आंधळा होतो म्हणून कावळ्याला ‘एकाक्ष’ सुद्धा म्हणतात. त्याच वेळेस सीता माता त्याला शाप देतात की तू एकाक्ष असल्याने सर्वजण तुला अशुभ मानतील, तेव्हा कावळा गयावया करून उःशाप मागतो तेव्हा त्याची दया येऊन सीता त्याला उःशाप देते की, मनुष्य मृत झाल्यावर त्याच्या दहाव्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होणार नाही आणि शिवाय ही दर्भाची काडी सुद्धा त्यावेळेस उपयोगी पडेल अशी आख्यायिका आहे…काक स्पर्श झालाच पाहिजे हा अट्टाहास आता सोडला पाहिजे. जिवंतपणी आई वडिलांची सेवा करा त्यांना काय हवे नको ते पहा.
आपण विज्ञान युगात वावरत असताना अशा प्रथांचा विरोध केला पाहिजे आणि आपल्या प्रिय व्यक्तींचे दशक्रिया विधी हा आपल्याच जन्मभूमी करण्याचा संकल्प येथून पुढे केला पाहिजे यासाठी श्रीगोंदा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अशोकराव आळेकर माजी उपाध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे, भाऊसाहेब खेतमाळीस, बाळू बाजीराव खेतमाळीस स्मशानभूमीतील जोगते हे रोज दशक्रिया विधी ठिकाणे भात ठेवत आहेत आणि तो भात खाण्यासाठी कावळे रोज हे याला लागले आहेत. त्यांचा उद्देश हाच आहे की श्रीगोंदा शहरातील दशक्रिया विधी हा बाहेरगावी न जाता तो श्रीगोंदा याच ठिकाणी करण्यात यावा या उद्देशाने रोज सकाळी हातातील कामे टाकून समाजसेवेचा वसा घेऊन ही मंडळी दशक्रिया विधी घाट या ठिकाणी एकत्र येत कावळ्यांना भात खाऊ घालतात जेणेकरून यापुढे दशक्रिया विधी हा श्रीगोंदा या ठिकाणी व्हावा यासाठी त्यांचा हा अल्पसा प्रयत्न आहे या प्रयत्नांना श्रीगोंदेकरणी साथ दिली पाहिजे अशी अपेक्षा आहे..
