नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराला आपण जे अनमोल मतदान केलं त्याबद्दल मी आपला हृदय अंतकरणापासून आभारी आहे. निवडणुका येतील आणि जातील विजय पराजय हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं हे आहे की आपण विस्थापित परिवर्तनाकडे वळत आहे याचाच मला सार्थ अभिमान आहे.
प्रस्थापितांच्या विरोधात घराणेशाहीच्या विरोधात कारखानदारीच्या विरोधात मतदार राजा आज मतदान करत आहे याची सुरुवात ही काल झालेल्या लोकसभेच्या मतमोजणीच्या वेळी लक्षात आले असेल. विस्थापित उमेदवाराच्या मताधिक्यामुळे जो निवडून येईल ही अपेक्षा राजकीय पक्षांना होती ती अपेक्षा कुठेतरी फोल ठरली. आपला उमेदवार निवडून नाही आला परंतु निवडून येणाऱ्या उमेदवाराला पराभूत करू शकतो हे कालच्या लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. आता तरी या राष्ट्रीय पक्षांनी विस्थापित मतदारांचा कौल लक्षात घेऊन विस्थापिताना उमेदवारी दिली पाहिजे आणि नाही दिली तरी येणाऱ्या विधानसभेला स्थानिक स्वराज्य संस्थेला विस्थापित हा आपल्या मतातून उपद्रव्य मूल्य दाखवल्याशिवाय राहणार नाही.
पिढी जात ज्यांच्या घरामध्ये राजकीय वारसा आहे अशा धन दांडग्या उमेदवाराला मतदारांनी नाकारले त्याबद्दल मतदारांचे हृदय अंतकरणापासून आभारी आहोत.
लोकसभा ये तो ट्रेलर था! विधानसभा अभी बाकी है!
आपलाच
गोरख दशरथ आळेकर

