श्रीगोंदा (प्रतिनिधी)श्रीगोंदा शहरात आणि तालुक्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे भाजपा पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक केबल टीव्ही टेलेकास्ट उद्योगातील उद्योजक श्री.राजेंद्र उकांडे यांची नुकतीच भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत त्यांना संघटनेकडून नियुक्तीपत्र सादर करण्यात आले असून, त्यांच्या नियुक्ती बद्दल विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विक्रमसिंग पाचपुतेंच्या नेतृत्वात आणि श्रीगोंद्याचे आमदार बबनराव (दादा) पाचपुते व खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

श्री. उकांडे यांच्या नियुक्तीबद्दल डॉ. प्रतिभा पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, बापूशेठ गोरे, अशोक खेडके, संग्राम घोडके, शहाजी खेतमाळीस, संजय खेतमाळीस, अंबादास औटी, राजेंद्र उकांडे मित्र मंडळासह विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उकांडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या नियुक्तीनंतर श्री.राजेंद्र उकांडे यांनी भाजप पक्षाच्या ध्येय – धोरणाशी एकनिष्ठ राहत संघटन वाढीसाठी सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
