
श्रीगोंदा : सोमवारी (दि. 22) रोजी भाजीपाल्याची आवक वाढल्याने पालक, मेथी, करडई या भाज्यांचे भाव घसरले, तर कोथिंबीर कवडीमोल भावात विकली जात होती.
समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाची पेरणी यंदा वेळेत झाली. तूर, मका, बाजरी उडीद या पिकांबरोबर भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याने बाजारात आवक वाढली आहे .
किरकोळ बाजारात मेथी 10ते 15 रुपये, शेपू 10ते 15रुपये, पालक 5ते 10रुपये, करडई 5ते 6रुपये भाव मिळाला. कोथिंबिरीचे ढिगारेच असल्याने 10रुपयांना 3जुड्या विकल्या जात होत्या.
किरकोळ बाजारात असलेले भाजीपाल्याचे दर (किलो ) पुढीलप्रमाणे : गवार -100 ते 120, वांगी -80 रुपये, टोमॅटो -80 ते 100 रुपये, कारली -80 ते 100, रुपये, दोडका – 80 रुपये, हिरवी मिरची 30 ते 40 रुपये. शेवगा 80 -100 रुपये, पालेभाज्या : मेथी -10 ते 15 रुपये, पालक – 5 ते 10 रुपये, शेपू – 10 रुपये, कोथिंबीर जुडी 3 ते 5रुपये.
