
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील मुरलीधर अण्णा होनराव माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत जैन संघटनेकडून 42 गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, कंपास, पेन इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
गरजवंत होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही मदत करण्यात आली. यावेळी जैन संघाचे तालुकाध्यक्ष श्री. बोरा, श्री. गोरे, दिलीप काटे, अशोक आळेकर, तसेच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शाळेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
