
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील शिवदुर्ग फाउंडेशनतर्फे शनिवार (दि. 20) व रविवार (दि. 21) रोजी ‘जशी वारकऱ्यांची पंढरीची वारी, तशीच आपली शिवदुर्ग वारी ‘ यानुसार पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम राबवली जाणार आहे.
या मोहिमेत ऐकून 97 जण सहभागी होणार आहेत. फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील दुर्गम, दुर्लक्षित व ऐतिहासिक गडकिल्ल्यांना भेटी देणे व त्यांचे संवर्धन करणे. तसेच त्यांचा अभ्यास करणे हा या ग्रुपचा हेतू आहे.
