
संतोष रा. कोथिंबीरे
9766083799
श्रीगोंदा : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात कधी गारवा तर कधी उष्णता जाणवते. या बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम माणसाच्या शरीरात जाणवत आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृधांपर्यंत सगळ्यांनाच या बदलत्या वातावरणाशी सामना करावा लागत आहे.

श्रीगोंदा तालुक्यासह शहरात यंदा पावसाचे प्रमाण चांगले आहे. सततच्या पावसामुळे शहरातील काही भागात, तसेच वाढ्या – वस्त्यावरील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी खड्ड्यान्त साचते आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यावर मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. वाढलेल्या मच्छरांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी सर्दी – खोकल्याचे रुग्ण वाढल्याने दवाखाने हाऊसफ़ुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदरीत शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे ‘तीन तेरा’ वाजल्याचे दिसून येत आहे

मोकाट कुत्र्यांचा वावर : शहरात मुकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुत्रे कळपाने फिरत आहेत. त्यामुळे त्यांचे माणसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. मोटर सायकलींगमागे मागे कुत्रे धावतात. त्यामुळे अपघात होत आहेत. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात रोज शहरासह ग्रामीण भागातून 10 ते 12 जण रेबीज प्रतिबंध लस घेण्यासाठी येतात. एकंदरीत शहरात कुत्र्यांची दहशत वाढली आहे.
सध्या नगरपरिषदेत प्रशासकीय राज सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरी प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून ‘जैसे थे’ च आहेत. पावसाळ्यापूर्वी कामे न झाल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
प्रभागातील नागरिकांच्या समस्या काही सामाजिक कार्यकर्ते घेऊन येतात. पण समस्यांचे निवारण होत नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते गोरख आळेकर यांनी ‘G NEWS’ शी बोलताना व्यक्त केली…
