
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील भिंगार अर्बन बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बॅंकेच्या श्रीगोंदा शाखेच्या स्थानिक सल्लागारपदी पोपटराव आनंदराव खेतमाळीस यांची निवड करण्यात आली. चेअरमन अनिलराव झोडगे, व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन यांनी खेतमाळीस यांना नियुक्तीचे पत्र दिले.
यावेळी पोपटराव बोरुडे, बापूशेठ गोरे, संतोष गोरे, नानासाहेब कोथिंबीरे, बबन गाडे, सुरेश शेंडगे, काका कदम, शहाजी खेतमाळीस, अनिल बोरुडे, आरिफ मालजपते, बँकेचे वरिष्ठ अधिकारी संजय साळवे, शाखाधिकारी राजेंद्र राऊत व कर्मचारी उपस्थित होते.
