
श्रीगोंदा : शेतकरी प्रश्नासाठी खा. निलेश लंके शनिवारी (दि. 6) रोजी पुन्हा आक्रमक झालेले पहायला मिळाले. शेतकऱ्यांसाठी आता माघार नाहीच अशी भूमिका खा. लंके यांनी घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व आंदोलकांनी ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकार्यालयासमोरच स्वयंपाक केला. तर खा.निलेश लंके अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी येत नाही तोपर्यंत आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशाराच खा. लंके यांनी दिला. काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून भाकरी थापल्या. यावेळी खा. लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनीही भाकरी थापून आंदोलनात सहभाग घेतला.
