
श्रीगोंदा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथिंबिरे मळा श्रीगोंदा या शाळेत नवगतांचे स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर रांगोळी काढून सजविण्यात आला होता. यावेळी उपस्थित महिलांनी मुलांचे औक्षण करून मुलांना गुलाब पुष्प व फुगे फोडून स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांनी मुलांना खाऊचे वाटप केले.
यावेळी नगरसेवक संतोष कोथिंबिरे, नानासाहेब कोथिंबिरे, बाबूशेठ बोडखे, शाळा समितीचे अध्यक्ष बंडू कोथिंबिरे, डॉ. चंद्रकांत कोथिंबिरे, डॉ. सागर कोथिंबिरे, पोपट कोथिंबिरे, भीमा मखरे शाळेच्या मुख्यध्यापिका लोखंडे मॅडम, शिक्षिका बोरुडे मॅडम उपस्थित होते…
