
श्रीगोंदा : जोरदार पावसाचा तडाखा इतर मालाबरोबर भाजीपाला पिकांना बसल्याचे दिसत आहे. पाण्याअभावी आधीच भाजीपाल्याची लागवड कमी प्रमाणात झाली होती. त्यातून जोरदार पावसाने तडाखा दिल्याने उत्पादनात घट झाल्याने बाजारात भाजीपाल्यांची आवक कमी प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव वाढल्याचे दिसत आहेत.
सध्या श्रीगोंदा बाजारात नगर, पुण्याहून माल येत आहे. सध्या पाऊस लवकर आला आहे. आता भाजीपाल्याची लागवड केली तरी साधारणपणे भाजीपाला बाजारात येण्यास दोन महिने लागतात. कमी लागवडीमुळे सध्या बाजारात कोथिंबीर भाव खात आहे.
किरकोळ बाजारात असलेले भाजीपाल्याचे दर पुढीलप्रमाणे : गवार -100 ते 120, वांगी -80 रुपये, टोमॅटो -80 ते 100रुपये, कारली 80 रुपये, दोडका – 80 रुपये, हिरवी मिरची 80ते 100 रुपये. शेवगा 80 ते 100रुपये, पालेभाज्या : मेथी -20 ते 30 रुपये, पालक – 15ते 20 रुपये, शेपू – 30 रुपये, कोथिंबीर जुडी 20 ते 30 रुपये.
