
श्रीगोंदा : अहिल्यानगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा सोमवार दि. १ जुलै रोजी अहिल्यानगर श्रीगोंदा इंडिया आघाडीच्या वतीने श्रीगोंदा येथे भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्यासाठी इंडिया आघाडीचे श्रीगोंदा तालुक्याचे प्रमुख नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार,राहुल जगताप, साजन पाचपुते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आनंदकर,
शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे, आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
तालुकाध्यक्ष हरिदास आबा शिर्के, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख विजय शेंडे, आपचे तालुकाध्यक्ष डॉ.अनिल कोकाटे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोहर पोटे, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष खेतमाळीस,काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष कांतीलाल कोकाटे, माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे, माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निशांत लोखंडे यांनी दिली.
या सत्कार सोहळ्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन इंडिया आघाडीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.
