
जूनच्या पहिल्याच आठवड्यात सुरू झालेल्या मान्सून पावसाने शेतकरी राजा सुखावला त्यातच काल झालेल्या जोरदार पावसाने सरस्वती नदी दुधडी भरून वाहिली.या पाण्याने प्रथमच डाके मळा बंधारा,पांढरकर मळा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पांढरकर मळ्यात फटाक्याची आतषबाजी करत आनंद शेतकऱ्यांनी व्यक्त केला..
सरस्वती नदी सुशोभीकरण समिती श्रीगोंदा शहरातील सरस्वती नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण हे काम 11 मे 2016 रोजी हाती घेतले होते हे काम करत असताना नदीचे पात्र मध्ये खोल खड्डे खोदण्यात आले जेणेकरून पावसाळ्याचे पाणी या खड्ड्यांमध्ये साठले जाईल आणि ते पाणी जमिनीत मुरावे यासाठी या समितीने काम केले होते. नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करत असताना सिमेंटी बंधारे बांधणे काळाची गरज आहे यासाठी दिवंगत खासदार दिलीप जी गांधी साहेब,माजी पालकमंत्री राम शिंदे सर,आमदार बबनदादा पाचपुते , उपजिल्हाधिकारी आनंदकर साहेब ,यांच्या कडे पाठपुरावा करून सरस्वती नदीवर आत्तापर्यंत कोथिंबीर मळा येथे एक बंदरा पूर्ण व दुसऱ्या बंधाऱ्याचे कामकाज चालू त्याचबरोबर राऊत मळा बंधारा पूर्ण पांढरकर मळा बंधारा पूर्ण, डाके मळा बंधारा पूर्ण ,त्याचबरोबर कोंबडे मळा बंधारा काम चालू अशा पद्धतीने साखळी बंधाऱ्यांची कामे सरस्वती नदी वर चालू आहेत . सरस्वती नदीवर आणखी पाच बंधारे या वर्षी करण्याचे काम सरस्वती नदी सुशुभकरण समिती अध्यक्ष गोरख आळेकर यानी सांगितले.
दिवंगत नेते सतीश शेठ पोखरणा दिवंगत बाळासाहेब शेंडगे यांनी केलेल्या सहकार्याची आठवण यावेळी सगळ्या शहरवासीयांना झाली.
शहाजी पांढरकर, गोरख डाके ,पांडुरंग डाके ,सतीश शेठ बोरा ,भाऊसाहेब खेतमाळीस, सचिन पांढरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष माधव बनसुडे यांनीही मोलाचे योगदान दिले.
