श्रीगोंदा : श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन तत्काळ तोडगा काढण्यासाठी श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा शहरातील माऊली संपर्क कार्यालय येथे जनता दरबार आयोजित केला होता. दुसर्यांदा आयोजित केलेल्या या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान हेच माझ्यासाठी सर्वात मोठी शक्ती आहे. मला पूर्ण विश्वास आहे, भविष्यातही जनता दरबारच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या समस्या वेळीच सोडवल्या जातील, असेही आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले. यावेळी मतदारसंघातून वेगवेगळ्या गावातून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या, अडचणी घेऊन आले होते.
