
श्रीगोंदा : सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना ( शिंदे) महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीराताई शिंदे यांची अखिल भारतीय रविदासिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव महाराज वाघमारे यांनी त्यांना नुकतेच दिले. १९ जानेवारी रोजी पुण्यातील कात्रज येथील संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांचे तिसरे धाम याठिकाणी येणाऱ्या रविदास जयंती निमित्ताने बैठक आयोजित केली होती. राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन आदरणीय सुखदेव महाराज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. मीराताई शिंदे यांचे सामाजिक व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांना महाराष्ट्रभर गुरू रविदास यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत महिलांचे संघटन करण्याची जबाबदारी दिली. यावेळी त्यांनी धर्म संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव महाराज यांनी दाखविलेला विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व दिलेल्या संधीचे मी सोनं करीन, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्रातून अनेक मान्यवर उपस्थित होते.
