श्रीगोंद्याचे सुपुत्र अरुण आनंदकर यांची अपर आयुक्तपदी नियुक्ती

श्रीगोंदा: श्रीगोंदा येथील सुपूत्र अरुण आनंदकर यांची नाशिकचे अपर आयुक्त (महसूल)पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर काम केले आहे. अरुण आनंदकर यांनी सुरुवातीच्या काळात सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत विक्रीकर निरीक्षक, लेखाधिकारी, नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता अशा विविध पदावर काम केले.अनुभव व कार्यपद्धती पाहून बढती पाहून
२०००साली ते उपजिल्हाधिकारी झाले. त्यांनी विविध जिल्ह्यांत उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. नगर जिल्ह्यातील निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी व नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य सरकारने घेतली. त्यांची राज्यपाल भवनात नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणूनही काही काळ पदभार पाहिला. राज्य सरकारने त्यांच्या कामाचा अनुभव व कार्यपद्धती पाहून अपर आयुक्तपदी बढती दिली आहे. सर्व सामान्य जनतेला नेहमी मदत करणारे अधिकारी म्हणून त्यांची वेगळीच ओळख आहे…
