
श्रीगोंदा : श्रीगोंदा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पोपटराव कोथिंबिरे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, सोसायटीचे माजी चेअरमन अशोकबापू आळेकर, आनंदकर सर, बापूराव सिदनकर, माजी संचालक बाबुशेठ बोडखे, मा. उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे, नगरसेवक संतोष कोथिंबिरे, शाळा समितीचे अध्यक्ष बंडू कोथिंबिरे, गोरख कोथिंबिरे यांनी त्त्यांचे अभिनंदन केले.
