
श्रीगोंदा : श्रीगोंद्यात संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त शनिवार (दि.27) पासून ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रोज पहाटे काकडा, विष्णू सहस्त्र प्रार्थना, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, महिला भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागर अशी दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. तसेच यानिमित्त रोज नामवंत कीर्तनकारांचे कीर्तने होणार आहेत.
शनिवारी दत्तात्रय महाराज खेडकर, रविवारी बालाजी महाराज कवठेकर, सोमवारी ज्ञानेश्वर महाराज रासकर, मंगळवारी रोहिदास महाराज हारदे, बुधवारी भूषण महाराज महापुरुष, गुरुवारी गणेश महाराज शिंदे, शुक्रवारी गणेश महाराज राऊत, शनिवारी प्रकाश महाराज जंजिरे, तर रविवारी काल्याचे कीर्तन प्रकाश महाराज जंजिरे यांचे किर्तन होणार आहे. त्यानंतर म्हाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 3) रोजी दुपारी 2 वाजता संत सावता महाराजांच्या पालखीची मिरवणूक होणार आहे.
