
श्रीगोंदा : आठवड्याच्या सुरवातीच्या दिवशी सोमवारी (ता.01) रोजी नगरच्या नेप्ती येथील उपबाजार समितीत 34 हजार 36 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला सरासरी 700 ते 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
सध्या शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पेरण्या सुरू आहेत. बी – बियाण्यासाठी शेतकऱ्यांना पैश्याची गरज आहे. सुरवातीच्या काळात कांदा विकताना शेतकऱ्यांना सरकाच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल भावाने विकावा लागला. मात्र आता बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत.
दरम्यान सोमवारी नगर बाजार समितीत 51 हजार 884 गोण्यांची आवक झाली होती. जवळपास 34 हजार 36 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला सरासरीनुसार 700 ते 3200 रुपये भाव मिळाला. यात प्रत वारीनुसार एक नंबरच्या कांद्याला 2700 ते 3200, दोन नंबरच्या कांद्याला 2000 ते 2700, तीन नंबरच्या कांद्याला 1300 ते 2000 आणि चार नंबरच्या कांद्याला 700 ते 1300 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
