
श्रीगोंदा : साई लॅब व थायरोकेअर यांच्या संयुक्त विद्धमाने महिलांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही तपासणी शनी चौक येथील साई लॅब येथे येथे होणार आहे. या शिबिरात रक्त तपासणीमधून किडणी, लिव्हर, हार्ट (कोलेस्ट्रोल लिपिड प्रोफाईल), थायरॉईड, विटामिन डी, विटामिन बी १२, कॅल्शियम, युरिक असिड, तीन महिन्याची शुगर, हिमोग्लोबिन, रक्तातील तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेटस्, आयर्न तसेच शरीरातील सर्व हार्मोनचे प्रकार यांची तपासणी केली जाणार आहे. हे शिबीर महिलांसाठी फक्त 1499 रुपयांमध्ये केले जाणार आहे. या शिबिराचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सागर कोथिंबिरे यांनी केले आहे.
