मालवण घटनेचा पत्रकार संघाच्या वतीने श्रीगोंद्यात निषेध
श्रीगोंदा : मालवण येथे केंद्रीय
मंत्री नारायण राणे यांनी महिला पत्रकाराचा माईक ओढून घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. या वर्तनाचा तीव्र निषेध करत श्रीगोंदा तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आवाज उठवला आहे.
पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर केले. ज्यात या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. प्रतिनिधींच्या मते, हा प्रकार पत्रकारितेवरील हल्ल्याचे गंभीर उदाहरण असून, या घटनेवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष माधव बनसोडे, सचिव डॉ. अमोल झेंडे, कार्याध्यक्ष शफीक हवालदार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर येवले, संघटक अमर घोडके, जिल्हा सदस्य राजेंद्र राऊत, इलेक्ट्रिक मीडिया तालुकाध्यक्ष अनिल तुपे, श्रीगोंदा शहराध्यक्ष नितीन रोही, प्रवक्ते किशोर मचे, वैभव हराळ, महादेव गावडे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
