श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील

सावतानागर भागातील देवकर मळा येथील माऊली मंदिर रस्त्यावर वर्षभरापूर्वी विजेचे खांब नगरपरिषदेने नावालाच उभे केले. पण अद्याप पर्यंत त्या पोलवर वीजपुरवठा सुरू केला नाही. या पोलवर वीजपुरवठा सुरू करावा, यासाठी किरण बनसुडे, माधव बनसुडे, मयूर बनसुडे हे नगरपरिषदेसमोर सोमवार (ता. 1) पासून उपोषणास बसले आहेत.
नगरपरिषदेने शहरातील अंतर्गत रस्त्यावर विजेसाठी पोल उभे केले आहेत. पण वीजपुरवठा सुरू नसल्याने ते बंद आहेत. त्यामुळे जाता -येताना नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे रस्त्यावर कधी कधी जाता – येताना नागरिकांना साप आडवे येतात. तसेच अंधारात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या परिसरातील नागरिकांची रात्री उशिरापर्यंतया रस्त्यावर रहदारी सुरू असते. जर या रस्त्यावर काही दुर्घटना घडली तर त्याला नगरपरिषद जबाबदार राहील. तरी नगरपरिषदेने वरील बाबींचा गांभीर्याने विचार करावा व या परिसरातील पोलवरील वीजपुरवठा सुरू करावा.या मागणीसाठी नागरिक उपोषणास बसले आहेत.
उपोषणकर्त्याची अहिल्या नगरचे खा. निलेश लंके, गोरख आळेकर ,प्रताप पाचपुते, बापू गोरे, सुधीर खेडकर, सुनील वाळके, शहाजी खेतमाळीस, संतोष खेतमाळीस, धनराज कोथिंबीरे, माऊली धाडगे, संकेत बनसोडे, युवराज तांबे वैभव बनसोडे अक्षय शेंडगे प्राण देवकर प्रथमेश देवकर सागर साळुंखे, सागर खेतमाळीस, प्रतीक बनसोडे, आशिष बनसोडे, दीपक बनसोडे, पंकज बनसोडे, प्रज्वल शिंदे, सागर साळुंखे, सागर खेतमाळीस, प्रतीक बनसोडे, आशिष बनसोडे, दीपक बनसोडे, पंकज बनसोडे, प्रज्वल शिंदे, विकास बोरुडे, माधव बोरुडे , विठ्ठल आनंदकर, संजय आनंदकर यांनी उपोषणाला पाठींबा दर्शविला .मुख्याधिकारी भगत मॅडम यांनी उपोषण कर्ते यांची भेट घेऊन उद्या पासून कामाला सुरूवात केली जाईल असे आश्वासन दिले. तरीही वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत उपोषणकर्ते उपोषणावर ठाम आहेत.
