💥 पारनेर विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी खेळनार ओबीसी कार्ड – राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचा रथ रोखनार ?💥 – पारनेरच्या राजकिय वर्तुळमध्ये चर्चा. पारनेर नगर विधानसभा 1972ला अस्तित्वत आली. तेव्हापासुन या मतदारसंघावर मराठा आमदारांचे वर्चस्व राहिले आहे. स्व.शंकरराव काळे ,स्व.बाबासाहेब ठुबे, श्री नंदकुमार झावरे , स्व वसंतराव झावरे , श्री विजयजी औटी, श्री निलेश लंके ई मराठा समाजाचे आमदारांचे नाव आहेत. पारनेर नगर मतदारसंघामध्ये जातिय समीकरणाचा विचार केला तर जावळपास 105000 लाखाच्या जवळ मराठा समाज आहे, 125000 हजाराच्या आसपास ओबीसी समाज आहे. दलित समाज 45000 आणि अल्पसंख्याक समाज 55000 आणि आदिवासी समाज 20000 च्या आसपास असल्याच बोलले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकला भाजपच्या उमेदवाराला जास्त प्रमानात अल्पसंख्याक , दलित , मराठा काहि प्रमानात ओबीसी मताचा फटका बसला. सुजय विखे यानी पारनेरमध्ये मराठा नेत्यांची जनू फौज सोबत ठेवली होती. मोठा एकही ओबीसी, दलित , अल्पसंख्याक समाजाचा नेता त्यांचा मंचावर नव्हता. याच अति आत्मविश्वास विखे याना पारनेरमध्ये नडल्याचं बोले जाते.आणि विखेसोबत जे होते अनेक प्रस्थापित राजकिय कुटुंबतील असल्याने त्यामधिल अनेक नेत्यांची प्रतिमा समाजात मलिन झालेली आहे. त्याचाच फायदा खासदार लंके याना झालेला दिसतो. लंके यांची सर्व सामान्य घरातिल उमेदवार हि प्रतिमा जमेची बाजु ठरली. आणि जणतेचि सहनुभूती लंके मिळली. याउलट पारनेर मधिल सर्व प्रस्थापित समाजाचे पुढारी विखे यांचे सोबत होते म्हणून पारनेर मध्ये प्रस्थापीथ विरुध्द विस्थापित हि भूमिका लंके हे जनतेत घेउन गेले आणि यशस्वी झाले. मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि महायुतीला नुकसान. हे निवडणूक निकालाने स्पस्ट झाले आहे. पारनेर मध्ये भरघोस माताधिक्य लंके याना मिळले आणि लंके यांचा विजय झाला. महाराष्ट्र विधानसभा अवघ्या काहि महिण्यावर आहे. त्यामुळे पारनेरचि जागा महायुतीला जिंकणे अशक्य असल्याच बोलल जात आहे. पारनेरचि जागा महायुती मध्ये भाजपच्या वाट्याला जाईल असे बोलले जाते. भाजपला महाविकास आघाडीचा रथ पारनेर मध्ये रोखायचा असेल तर नवीन काहि व्यूहरचना आखावी लागनार आहे. म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडुन पारनेरमध्ये नवीन उमेदवाराची चाचपणी चालु असल्याच बोलले जाते. पारनेर विधानसभेत सर्व सामान्य कुटुंबतील नवीन ओबीसी चेहरा देन्याचा विचार भारतीय जनता पार्टी करत आहे.अश्या धक्कातंत्रासाठी भाजप ओळखली जाते. अशी खात्रीलायक महिती सूत्राकडुन समजली आहे. त्यामुळे आगामी पारनेर विधानसभेत निवडणूकिमध्ये राजकिय आणि सामाजिक समीकरण बदलतात का याकडे संपूर्ण नगर जिल्हयाचे लक्ष्य लागले आहे. भारतीय जनता पार्टीचा संभाव्य ओबीसी उमेदवार कोण? हा पारनेरच्या जणतेत कुतुहलाचा विषय ठरला आहे.
