
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्टस अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे इतिहास विभाग आयोजित ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन संपन्न झाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने भारतीय व आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन भरविले होते.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन ऐतिहासिक नाणी संग्राहक मा. श्री. महेश लाडणे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी श्री महेश लाडणे म्हणाले की, नाणी संग्रहाचा छंद मला इयत्ता नववीपासून लागलेला आहे जर त्या काळात मोबाईल असता तर मी इतक्या मोठ्या प्रमाणात नाणी संग्रहित करू शकलो नसतो. त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘रयतेचे आभाळ आहे शिवबा ही स्वरचित कविता सादर केली
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यामागील उद्देश स्पष्ट केला ते म्हणाले, “नार्ण इतिहासकालीन अभ्यासाचे महत्त्वपूर्ण दस्ताऐवज असल्याने इतिहास प्रेमींसाठी नाण्यांचा अभ्यास हे एक स्वप्न असते. ते स्वप्न आज या निमित्ताने पूर्ण होत आहे. नाण्यांच्या माध्यमातून इतिहासकालीन आर्थिक संदर्भाचा अभ्यास आपणास क येतो. आज श्री. महेश लाडणे यांसारखे अभ्यासक नाण्यांच्या माध्यमातून ज्ञान पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.”
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत इतिहास विभाग प्रा. वि पवार यांनी केले. या प्रदर्शनासाठी नाणी संग्राहक मा. श्री. आदिनाथ भुजबळ, कर विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मोह सांगळे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, रंगतरंग स्पर्धेचे कार्याध्यक्ष प्रा. अरुण देशमुख, आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा. डॉ. निलेश मालप् प्रा. डॉ. देविदास रणधीर., प्रा. डॉ. बंडेराव तराळ यांच्यासह प्राध्यापक प्राध्यापवे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रदर्शनाचे सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते यांनी केले.
