
श्रीगोंदा : काष्टी (ता. श्रीगोंदा ) येथील परिक्रमा महाविद्यालयाच्या वार्षिक स्नहसंमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन परिक्रमा शैक्षणिक संकुलनाचे अध्यक्ष डॉ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते, यांच्याहस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहूणे, वसंत हंकारे सर, परिक्रमा शैक्षनिक संकलनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रतापसिंह बबनराव पाचपुते, परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे सचिव तसेच श्रीगोंदा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार विक्रसिंह बबनराव पाचपुते, अतिरिक्त मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा. अनिल पुंड व सर्व विभागाचे प्राचार्य, वार्षिक स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष, व विद्यार्थी सचिव उपस्थित होते. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर शैक्षणिक गुणवत्तेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व राष्ट्रीय पातळीवर रोबोट, AI व projet स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देउन गुणगौरव करण्यात आला राष्ट्रीयपातळीवरच्या स्पर्धा देशातील नामांकित IIT संस्था तसेच इतर महाविद्यालयात पार पडल्या. तसेच परिक्रमा शैक्षणिक संकुलातील शिक्षकांची PhD पूर्ण झालेल्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. त्यामध्ये इंजीनियरिंग विभागाचे डॉ. सुधीर दिवेकर, डॉ. हरिश अवचट, डॉ. आरती सूर्यवंशी तंत्रनिकेतनचे डॉ. प्रशांत सूर्यवंशी, फार्मसीचे डॉ. मेघना रायकर यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच, श्रीगोंदा-नगर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांचा सत्कार समारंभ परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या वतीने करण्यात आला व त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गायन, यांसारख्या विविध कला प्रकारा मध्ये आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.संपूर्ण स्नेह संमेलनाला विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. महाविद्यालयाच्या प्रशासनाने यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली.
