श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात एकूण 116 गावे असून महाराष्ट्र शासनाकडील निर्देशानुसार दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून खरीप हंगाम 2024 करिता शेतकरी स्तरावरून मोबाईल द्वारे ई पिक पाहणी नोंद सुरू करण्यात येत आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी कृपया ई पीक पाहणी DCS व्हर्जन 3.0.2 ऍप्प आपल्या मोबाईल हँडसेट मध्ये अद्यावत करून घ्यावे व आपल्या शेतातील पिकांची नोंद लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. शासनाकडुन पिक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेस ते वाटप करणेसाठी सर्व शेतकरी बांधवांचे पीक पेराची नोंद पीक पाहणी ऍप्प द्वारे न केलेस शासनाकडील अनुदान बाधित शेतकरी यांना मिळणार नाही, तरी तालुका प्रशासनाकडुन जाहीर आवाहन करणेत येते आहे की, सर्व शेतकरी बंधुनी आपआपल्या शेतातील पीक पेराची नोंद तात्काळ ‘ई-पीक पाहणी” अॅप वरुन करणेत यावी. या कामी अडचणी उदभवलेस संबंधित गावचे तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी (महसुल), तालुका कृषी अधिकारी व तहसिल कार्यालय श्रीगोंदा यांचेशी संपर्क साधावा.
