
श्रीगोंदा : शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जाऊन शेतमाल पिकवतो. त्यापुढे जाऊन उत्पादित केलेल्या मालाला बाजारभाव मिळेल की नाही याची गॅरंटी नाही, त्यातूनही तो आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेतो पण तिथे सुद्धा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक मिळते.
असाच प्रकार श्रीगोंद्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडला. बाळू धुळाजी कोथिंबिरे या शेतकऱ्याने त्यांच्याकडील १० गोण्या तूर बाजारसमितीमधील भावेश ट्रेडिंग कंपनी यांच्याकडे विक्रीसाठी नेली तेव्हा प्रत्येकी एक किलो प्रमाणे त्यांच्या दहा गोण्यामागे दहा किलो तूर कट करून त्यांनी जमा करून घेतली त्यानंतर तुरीचे पैसे मागितल्यानंतर पैसे देण्यास नकार देऊन तूला घरी येऊन सांगायचं होत का पैसे नाहीत म्हणून जमत नसेल तर तूर भरून घेऊन जा माझ्याकडे पैसे आल्यावर देईल अशी अरेरावीची भाषा त्यांनी सदर शेतकऱ्यास वापरली.
त्यानंतर कोथिंबीरे या शेतकऱ्याने बाजार समितीचे सभापती, सहायक निबंधक यांच्याकडे या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली आहे त्यावर आता संबंधिताकडून या व्यापाऱ्यावर काय कारवाई होते शेतकऱ्याला न्याय मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित व्यापाऱ्याकडे माल खरेदी करायला भांडवल नसेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित शेतकऱ्याचे पैसे आजच्या आज द्यावे. तसेच एका गोणी मागे 1 किलो वजन कसे वजा करता? याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती लक्ष का देत नाही? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवरातील व्यापाऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्याचे गोणी मागे 1 किलो वजन कमी केले आहे? माल कोणताही असो मोकळ्या गोणीचे वजन 1 किलो भरते का? ज्या ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचे गोणी मागे 1 किलो वजन कमी केले त्या सर्व व्यापऱ्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर 1 किलो गोणीप्रमाणे पैसे जमा करा अन्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गोरख आळेकर यांनी जी न्यु शी बोलताना दिला आहे.
